केज तालुका शिक्षक पत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार..!
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज येथील तालुका शिक्षक पत संस्थेच्या चेअरमन आणि सचिवपदी चिंचोलीमाळी येथील कल्याण काळे, व संजय गलांडे यांची निवड झाल्या बद्दल भाजपाचे जेष्ठ नेते सुनिल आबा गलांडेपाटील यांनी या भूमिपुत्रांसह संचालकांच्या सत्कार सोहळ्याचे सोमवारी दि.27 रोजी येथील संत नामदेव महाराज सभागृहात आयोजन केले होते.
चिंचोलीमाळी येथील संत नामदेव महाराज सभागृहात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी भाजपाचे जेष्ठ नेते सुनिल आबा गलांडेपाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनिल देशमुख, चेअरमन अरुण काळे हे होते.
या सत्कार सोहळ्यात चिंचोलीमाळीचे भूमिपुत्र चेअरमन कल्याण काळे, सचिव संजय गलांडे, यांचेसह उपाध्यक्ष बाळासाहेब अंकुशे, संचालक श्रीराम देशमुख, अनिल कोरडे, बाळासाहेब जोगदंड, बळीराम थोरात, विजयकुमार आंधळे आणि श्रीमती हिराबाई शेळके-पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी सुनिलआबा गलांडेपाटील, चेअरमन कल्याण काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब अंकुशे, सुधाकर ढाकणे, श्रीमती हिराबाई शेळके - पवार, जितेंद्र देशमुख, चंद्रकांत भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार पत्रकार मधुकर सिरसट यांनी मानले.
यावेळी दगडू दळवे, दिलीप गायकवाड, जितेंद्र देशमुख, रामभाऊ नखाते, भगवान काळे, चंद्रकांत भुजबळ, पत्रकार अनिल गलांडे, रवींद्र गलांडे, बालाजी राऊत, पांडुरंग गलांडे, बब्रुवान नखाते, दगडू गलांडे, जालिंदर गलांडे, मोहन बर्डे, सुनिल मेहरकर, वैजनाथ राऊत, किसनराव देशमुख, मनोज चिंचोलकर रविकुमार गायकवाड, शशिकांत शिंदे, धनराज नखाते, अमीन शेख, बलभीम माने, जाफर शेख, राजाभाऊ नखाते, दादाराव घोडके,दत्तू नखाते, महेंद्र घोडके, माणिक भांगे, पुंडलिक पोपळघट, आयुब पठाण, राजाराम गलांडे, वृंदावणी घोडके, प्रमोद गलांडे, अशोक शिंदे, शशिकांत पवार, जगन्नाथ काळे, दत्तात्रय देशमुख, विक्रम घुंबरे, अमोल जाधव,सुरेश काळे यांचेसह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.




Post a Comment