कौडगाव ग्रा.पं.कार्यालयामध्ये ग्रामरोजगार सेवकास मारहाण..!
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज तालुक्यातील कौडगाव ग्रामपंचायत सत्ताबदल झाल्यापासून नेहमी वादाच्या भोवन्यात आहे. निवडणूक निकालादिवशी मोठा गोंधळ झाला होता. आता ग्रामरोजगार सेवकास गावातील एका व्यक्तीने मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (दि.२७) समोर आला आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांकडून चौकशी केली आहे. रविंद्र चाटे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी कौडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामरोजगार सेवक तानाजी मुकिंदा पौळ यांना शिवीगाळ व मारहाण केली आहे. यावेळी ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली.
वादाचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून चौकशी होती. याप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांकडून चौकशी केली आहे. या घटनेनंतर ग्रामरोजगार सेवक तानाजी पौळ यांनी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि. योगेश उबाळे यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. त्यानंतर रविंद्र चाटे यांच्यासमवेत ग्रामपंचायतच्या पदाधिकान्यांनी ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दोघांना समज देऊन समोपचाराने वाद मिटविला असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते. दरम्यान, यापूर्वी देखील कौडगावमध्ये निवडणूक निकालादिवशी मोठा वाद झाला होता त्या मुळे वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.
त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती. आता पुन्हा एकदा वाद उफाळून आला, असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन गावात अशांतता पसरविणान्या व्यक्तीविरोधात वेळीच पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
युसूफवडगाव पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी केली आहे. माझ्याविरूद्ध खोटी तक्रार देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविले. तानाजी पौळ, ग्रामरोजगार सेवक.




Post a Comment