मराठा समाजातील युवक-युवतींनी सर्थी योजने अंतर्गत येणारया सर्व कोर्सेसचा लाभ घ्यावा-अरूण सपाटे..!
परळी वैजनाथ प्रतिनिधी
छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सर्थी, संस्थेच्या वतीने परळी आय.जी.एम.इन्स्टयुट नाथ टॉकिज भागवत मंगल कार्यालयाच्या समोर व इतर सर्वच एमकेसीएल केंद्राच्या ठीकाणी जाउन सर्व मराठा युवक, युवतींसाठी मोफत व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांनी या योजनांचा मोफत लाभ घ्यावा व महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि.मार्फत हे प्रशिक्षण तालुका स्तरापर्यंत देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. यातुन मराठा, कुणबी मराठा वय १८ ते ४५ वर्ष वयोटातील उमेदवारांना हे व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणर आहे तरी सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सर्थी योजने अंतर्गत येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अरूण सपाटे यांनी केले आहे.




Post a Comment