ज्येष्ठ संपादक-साहित्यिक-भीमयुग नाटकाचे लेखक रानबा गायकवाड यांचा "भीमयुगकार" पदवीने सन्मान..!

ज्येष्ठ संपादक-साहित्यिक-भीमयुग नाटकाचे लेखक रानबा गायकवाड यांचा "भीमयुगकार" पदवीने सन्मान..!


परळी प्रतिनिधी-दि.१६

येथील तक्षशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा साप्ताहिक मानपत्र यांच्या वतीने संपादक बालासाहेब जगतकर यांनी भूमीपुत्रांचा सत्कार व भीमयुग नाटकाचे आयोजन केले होते.या प्रसंगी परळी सिने-नाटय कलावंत संघटना, सम्यक थिएटर्स, अ.भा.नाटय परिषद शाखा परळी, रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई, सूर्यप्रकाश फाउंडेशन, परळी आणि तक्षशीला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, परळी-वै. आणि तमाम रंगकर्मी व समस्त भारतीय नागरिकांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ संपादक-साहित्यिक-नाटककार रानबा गायकवाड यांना "भीमयुगकार" या पदवीने सन्मानित करण्यात आले. भीमयुग या क्रांतीकारी आंबेडकरवादी नाटकाच्या लेखना साठी त्यांचा हा गौरव करण्यात आला. प्रतिभावंत सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी भीमयुग नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्रभर ही नाट्यकृती गाजत आहे. सम्यक थिएटर्स निर्मित आणि परळी सिने-नाटय कलावंत संघटना प्रस्तूत 'भीमयुग' नवा इतिहास घडविणारी नाट्यकृती असल्याचे उद्गार मान्यवरांनी व्यक्त केले.रानबा गायकवाड यांनी वैचारिक लेखन, नाटक,कथा-कवितेच्या माध्यमातून साहित्याचे दालन समृद्ध केले आहे.


तक्षशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी भूमीपुत्रांचा सत्कार व भीमयुग नाटकाचे आयोजन केले होते. या प्रसंगी भन्ते सह ज्येष्ठ विधिज्ञ अनंतराव जगतकर,बालासाहेब इंगळे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, ऍड.दिलीप उजगरे, मिलिंद घाडगे, लुगडे महाराज, प्रा.अतुल दुबे, प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे,प्रा. विलास रोडे, प्रकाशसिंग तुसाम, विठ्ठलराव झिलमेवाड, शेख गणी, निवृत्ती खंदारे, ब्रम्हानंद कांबळे, महेश होनमाने, भगवान साकसमुद्रे, मारोती कांबळे, विकास वाघमारे, विद्याधर सिरसाट, पुजा कुरुंद, रुपाली सिरसाट, रेखा मुंडे, सागर हानवते, सिध्दांत लांडगे, केशव कुकडे, पृथ्वी शिंदे, आकाश सावंत, विनायक काळे, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विधिज्ञ दिलीप मामा उजगरे यांनी रानबा गायकवाड यांचा परिचय करून दिला तर रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे सचिव बालासाहेब इंगळे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

भीमनगर येथील सुगंधी कुटी बौद्ध विहार परिसरात हा सोहळा संपन्न झाला. भीमयुगकार पदवी मानपत्राचे शब्दांकन प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे तर मानपत्र वाचन सिद्धेश्वर इंगोले यांनी केले. निवेदक बा.सो.कांबळे यांनी सूत्र संचालन तर मिलिंद घाडगे यांनी आभार प्रदर्शन केले. मनोज कदम, अमृत मराठे निर्मित आणि डॉ.अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित ग्लोबलआडगाव चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेता व जेष्ठ साहित्यीक रानबा गायकवाड यांना 'भीमयुगकार' पदवी प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post