परळी शहरांमध्ये राज्यस्तरीय सुपरस्टार डान्सर फेस्टिवलचे आयोजन..!

परळी शहरांमध्ये राज्यस्तरीय सुपरस्टार डान्सर फेस्टिवलचे आयोजन..!


परळी प्रतिनिधी

परळी शहरांमध्ये राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा,फॅशन शो, समर कॅम्प चे आयोजन बंसल क्लासेस व राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट तथा गंगाज् ओशन डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे गंगा गवळी यांनी सांगितले आहे.


या स्पर्धेमध्ये बंसल क्लासेस च्या वतीने फॅशन फियस्टा फॅशन शो स्पर्धा वयोगट पाच वर्षे ते 85 वर्षापर्यंत महिला पुरुष यामध्ये सहभाग घेऊ शकतात प्रथम फेरी दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता बचपन क्युरियस किड्स कावेरी प्लाजाजवळ जैन हॉस्पिटल शेजारी येथे होणार आहे या स्पर्धेमधील निवडण्यात आलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ही 2 जून 2023 रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी नृत्यदिग्दर्शक , डान्स इंडिया डान्स फेम, सुपर डांसर मेंटॉर आणि जज असलेले वैभव घुगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
 
उन्हाळी नृत्य शिबिर समर स्पेशल 2023 या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे हा कॅम्प दिनांक 1 मे ते 30 मे या कालावधीमध्ये पहिली बॅच सकाळी 7:30 ते 9:30 व दुसरी बॅच सायंकाळी 4 ते 6 वाजता होणार आहे या डान्स कॅम्पमध्ये हिप हॉप, कंटेम्पप्ररी, फ्री-स्टाईल, ज्याज इत्यादी प्रकार वयोगटांनुसार शिकवली जातील या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिकलेल्या डान्सचे प्रात्यक्षिक हे दिनांक 2 जून रोजी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे होणार आहे. 

या कार्यक्रमासाठी बॉलीवुड कोरिओग्राफर साहिल साह हे उपस्थित राहणार आहेत या त्यामधील प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत तर सुपरस्टार डांसर राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा तीन वयोगटांमध्ये होणार आहे यामध्ये पहिला गट वय वर्ष 5 ते 10, 11 ते 14 आणि 15 ते 65 या वयोगटांमध्ये सोलो आणि डुएट या प्रकारामध्ये होईल या स्पर्धेचा पहिला राऊंड दिनांक 20 मे 2023 रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता याची सुरुवात होईल या स्पर्धेची ग्रँड फिनाले 2 जून 2023 रोजी होईल.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शक, मेंटॉर,जज वैभव घुगे सिने कोरिओग्राफर, सुपर जज साहिल साह यांची उपस्थिती लाभणार आहे या स्पर्धेचे पारितोषिक रोख रक्कम एक लाख 76 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचे गौरव करण्यात येणार या स्पर्धेतील तीन विजेत्यांना साहिल साह यांच्या आगामी व्हिडिओ अल्बम सॉंग मध्ये संधी मिळणार तरीही या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी बचपन फ्युरियस किड्स या ठिकाणी नाव नोंदवावे अधिक माहितीसाठी संपर्क मो. 9420220937, 7276755227, 8600888062 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

या स्पर्धेसाठी राज्यातील नृत्य स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राजस्थानी चारिटेबल ट्रिपल ट्रस्ट गंगाज् ओशन डान्स अकॅडमीचे प्रमुख नृत्य दिग्दर्शक गंगा गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post