रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांची सलग तिसऱ्यांदा निवड..!

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांची सलग तिसऱ्यांदा निवड..!


मुंबई

महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर 36 अशासकीय सदस्य नियुक्ती केली आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी विजय गोखले यांची निवड झाली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागप्रमुख तथा नाट्य परिषदेच्या कार्यवाह प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. हे नियुक्ती आदेश त्यांना प्राप्त झाले आहेत. प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी-गिरगावकर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई, जि.बीड यांची महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून सलग तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सलग तिसऱ्यांदा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसा शासन निर्णय कालच निर्गमित करण्यात आलेला असून शासन स्तरावर नाट्य विषयक कार्य करण्यासाठी ही परिनिरीक्षण मंडळ अर्थात सेन्सॉर फार महत्त्वाचे कार्य करत असते. यामध्ये सदस्य म्हणून डॉ.संपदा कुलकर्णी यांची ही सलग तिसऱ्यांदा नियुक्ती आहे. मराठवाड्यातील पहिलीच महिला म्हणूनही याचा सर्वत्र गौरव केला जात आहे.

डॉ.संपदा कुलकर्णी या गेल्या पंचवीस वर्षापासून मराठी रंगभूमीशी निगडित आहेत. रंगभूमीवरील त्यांचा अनुभव आणि उल्लेखनीय कार्यामुळे शासनाने दखल घेत त्यांची ही नियुक्ती केलेली आहे. डॉ.संपदा कुलकर्णी या गेल्या 25 वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी नाट्यप्रशिक्षण अभिनय, दिग्दर्शन व निर्मितीद्वारे राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच मराठवाडयाच्या रंगभूमीला चालना दिली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक कलावंत व बालकलावंत आज हौशी-व्यवसायिक रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने केलेल्या या निवडीबद्दल त्यांचे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ अध्यक्ष विजय गोखले, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे, प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर, डॉ.भारत भूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ.दिपाताई क्षीरसागर, डॉ.संजय पाटील देवळाणकर, डॉ.दिलीप घारे, प्रा.यशवंत देशमुख, राजकिशोर (पापा) मोदी, बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, डॉ.विनोद जगतकर, प्रा.एस.एल.देशमुख, अमर हबीब, डॉ.गणेश चंदनशिवे, डॉ.सतीश पावडे, प्रा.स्मिता साबळे, डॉ.ज्ञानेश्वर सोनवणे, डॉ.किरण चक्रे, डॉ.अनिलकुमार साळवे, डॉ.सिद्धार्थ तायडे, भीमयुगकार रानबा गायकवाड, डॉ.गणेश मुडेगावकर, अखिल भारतीय नाटय परिषद शाखा बीड, परळी, अंबाजोगाई येथील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि रंगकर्मींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post