प्रभाग क्रमांक (जुना-१३)१४ मधील नाले व ओढ्यांची सफाई नगर परिषद ने तत्काळ करावी-गणेश वाळके..!

प्रभाग क्रमांक (जुना-१३)१४ मधील नाले व ओढ्यांची सफाई नगर परिषद ने तत्काळ करावी-गणेश वाळके..!


परळी-वै प्रतिनिधी

परळी-वै शहारामधील नाले ओढ्यांची सफाई तात्काळ करुन घ्यावी, प्रभाग क्रमांक (जुना-१३) १४ मधील नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत आहे, काही लोकांच्या दारात पाणी साचत असून याचा नागरीकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. नालीचे पाणी रस्त्यावर लोकांच्या दारात साचल्याने मंच्चरांचा देखील त्रास होत आहे.

प्रभागातील एरिया पुढीप्रमाणे आहेत, ते नगर परिषदेने तात्काळ साफ करुन घ्यावेत. बाजीप्रभु नगर, इंडस्ट्रीज एरिया, भाजी मार्केट लाईन अरुणोदय मार्केट, साई नगर, फाऊंडेशन स्कूल रोड जवळील नाली जी पूर्ण भूजलेली आहे, कडबा मार्केट जवळील लाईट डीपो येथे साचत असलेले नालीतील पाणी, अमर मैदान जवळील भाग, गुरुकृपा नगर, स्वाभिमान नगर, स्नेह नगर पाठीमागील भाग, बसवेश्वर चौक जवळील पुल, चोकोबा मंदिर परिसर, अभिनव विद्यालय मागील परिसर हे सर्व भागातील ओढयांची व नाल्यांची नगर परिषद ने मोठा पाऊस पडण्या अगोदर तात्काळ सफाई करून घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post