गायरान धारकांच्या न्याय हक्कांसाठी महामोर्चात मुंबई येथे लाभधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-किशोर भोले..!
गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील गायरान धारकांवर व अतिक्रमण धारकांवर अन्याय करणारा निर्णय जातीवादी सरकारने काढून शोषित पिडित उपेक्षित कष्टकरी लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
रहात असलेल्या घरात व कसत असलेल्या जमिनीचा ताबा वापस मिळवण्यासाठी शासनाने नोटीस पाठवल्या आहेत म्हणून गायरान धारक व अतिक्रमण धारकांसाठी हि धोक्याची घंटा आहे त्यामुळे वेळीच हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी वंचित समुहाने जागे व्हावे व सरकारच्या विरोधात बंड करून उठावे सर्व समूहाचे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० जूलै रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विधान भवनावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील सर्व अतिक्रमण व गायधारकांनी मोठ्या संख्येने होत असलेल्या महामोर्चात सहभागी व्हावे सरकारने दिलेल्या नोटीस रद्द करुन कसत असलेल्या जमिनीचा सातबारा देण्यात यावा व अतिक्रमण धारकांना पिटी आर देण्यात यावा यासाठी ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चात गेवराई तालुक्यातील गायरान धारक व अतिक्रमण धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे.




Post a Comment