समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजेच महादेव किरवले..!

समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजेच महादेव किरवले..!


लोखंडाचे चणे खाल्ल्याशिवाय देव पण येत नाही. या म्हणीप्रमाणे मनुष्याने आपल्या जीवनात अथक परिश्रम काबाडकष्ट करून असंख्य अडीअडचणीवर मात करून अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करण्यासाठी जिवापाड मेहनत करून आपली उपलब्धी प्राप्त करण्यासाठी अनेक खस्ता खाऊन राखेतून जन्म घेऊन उंच आकाशी भरारी मारणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे यशाची उत्तुंग शिखरे गाठूनही समाजाशी गरीबीशीआपल्या मित्रांशी नाळ न तोडणाऱ्या व गरिबीची जाण असणाऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त हा शब्दप्रपंच.

     वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा कालखंड हा सिरसाळा परिसरातील दलित समाजासाठी फार अडी अडचणीचा काळ होता. त्या कालखंडामध्ये दलित समाजाची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती ही अत्यंत खालावलेल्या अवस्थेत होती. गरीबीच्या झळा तेथील दलित समाजाला प्रचंड प्रमाणात सोसाव्या लागत होत्या. अनेक दलित कुटुंबे ही शेतामध्ये शेतमजूर म्हणून वीट भट्टीवर वीट कामगार म्हणून बरीचकुटुंबे ही हाताला लागेल की काम करून मोलमजुरी करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. शिक्षणापासून वंचित राहिलेली होती. याच कालखंडामध्ये सिरसाळा परिसरामध्ये भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी दलितावर अन्याय अत्याचार होत होते त्या ठिकाणी प्रतिउत्तर देण्याचं व त्याविरुद्ध महायुद्ध पुकारण्याचं काम सुरू झालेलं होतं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न निर्माण झालेला होता. प्रत्येक लहान, थोर माणसांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी देखील युवा पिढी सज्ज झाली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका, संघटित, व्हा. संघर्ष करा. हा मंत्र अमलात आणण्यासाठी भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून व अनेक युवा संघटनेच्या माध्यमातून युवकांना दलित चळवळीच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू झालेलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात मोठ व्हायचं असेल तर शिक्षणाचा मार्ग धरला पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवक शिक्षणाच्या मार्गाकडे वळले. मोळी विकू पण शाळा शिकू हा मंत्र अंगीकारण्यांची संख्या वाढत राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तू साहेब नाही झालास तर तू साहेबांचा बाप बन या शिकवणीचा देखील अनेक लोकांनी अंगीकार करून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला. आपलं अठरा विश्व दारिद्र्य, गरीबी, मागासलेपण दूर करायचा असेल तर शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाऊन समाजाची सेवा केल्याशिवाय समाज सुधारता येत नाही हा मंत्र अनेक लोकांनी स्वतःच्या मनात रुजवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जीवाचे रान करून अथक परिश्रम करून शिक्षणाच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करण्याचे काम केलं. त्यात अनेक लोक यशस्वी झाले.

    प्रशासकीय सेवेत बहुजनांच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता येत नाही. हा काही लोकांचा खोडसाळ गैरसमज सिरसाळा परिसरातील एका गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण करून दाखवला. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव आहे महादेव किरवले. दिनांक 31 ऑगस्ट हा आदरणीय महादेवजी किरवले यांच्या वाढदिवसाचा दिवस. महादेव किरवले यांचा जन्म एका अत्यंत हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीमध्ये दिवस जीवन जगणाऱ्या कुटुंबामध्ये झालेला होता. लहानपणापासूनच अत्यंत हुशार व सामाजिक जाणीव मनात ठेवून समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं. समाजामुळे आपण आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजावर अनंत उपकार केले आहेत. त्या उपकाराची परतफेड समाजाच्या उन्नतीसाठी हितासाठी समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला सामोरे जाणे समाजातल्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी लढणे त्याला समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे थांबणे, शक्य त्यांना जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी हातभार लावणे, समाजाच्या प्रत्येक वाईट प्रसंगी समाजाला साथ देणे या गोष्टी लहानपणापासूनच आदरणीय महादेव किरवले हे करत आलेले आहेत. आदरणीय महादेव किरवले यांनी लोकसेवा आयोगाची महत्त्वाची पदवी संपादन करून आज ते एका उच्च व मानाच्या पदावर कार्यरत आहेत. आपल्या समाजात एखादा माणूस हा साधा चपराशी झाला तरी तो त्याची अवकात दाखवतो. तो जवळच्या माणसाला देखील कधी विचारत नाही. आपल्या जवळच्या माणसाला देखील ते विसरून जातो. ज्यांनी त्याला मोठं केलेला आहे त्या माणसाला देखील तो विसरून जातो. परंतु आदरणीय महादेवजी किरवले यांनी कधीच आपली मर्यादा सोडलेली नाही. माणुसकीचं जिव्हाळ्याचे प्रेमाचे नातं त्यांनी कधीच सोडलं नाही. नातलग जिवलग मित्र नातेवाई क समाज समाजातील माणसे यांना कधीच त्यांनी दूर सारलेले नाही.

   आपल्याकडे असलेल्या मोठ्या पदाचा, वैभवाचा त्यांनी कधीही गर्व केलेला नाही. प्रत्येक माणसाची त्यांनी जिव्हाळ्याची, आपुलकीचे, माणुसकीचे जे नातेसंबंध निर्माण केलेले आहेत ते मरेपर्यंत कोणताही माणूस त्यांना विसरू शकत नाही. सिरसाळा परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात जे बदल घडून आलेले आहेत. त्या परिसरात शैक्षणिक क्रांती निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थी त्या परिसरामध्ये शिक्षण घेऊन मोठे झालेले आहेत. त्या सर्वांचा प्रेरणास्थान म्हणजेच आदरणीय महादेवजी किरवले साहेब.

   आदरणीय किरवले साहेबांनी अनेक होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना अर्थसहाय्य देखील केलेल आहे. आदरणीय किरवले साहेबांनी अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात मोठे होण्यासाठी मोठ्या पदावर जाण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनुसार प्रत्येकाने जगलं पाहिजे. फुले, आंबेडकरी, चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक माणसाने आपुलकीने वागले पाहिजे. भगवान गौतम बुद्धाच्या शांतीचा मार्ग धरून जगामध्ये मानवतावाद, बंधुत्व निर्माण झालं पाहिजे. या विचारसरणीचा हा माणूस नेहमीच प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीला येणारा माणूस प्रत्येक माणसाने शिकून मोठं झाला पाहिजे.

    प्रशासकीय सेवेत येऊन प्रशासकीय सेवेत बहुजन समाजासाठी योगदान दिले पाहिजे. या मताचा माणूस आदरणीय महादेवजी किरवले यांनी अनेक विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून अनेक युवक हे प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी, लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहेत. अनेक गोरगरीब विद्यार्थी हे आपापल्या बुद्धीप्रमाणे त्यांना आवडेल त्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ध्रुवताऱ्यासारखं मार्गदर्शन आदरणीय किरवले साहेब करत आहेत. भविष्यात सिरसाळा परिसरातील अनेक विद्यार्थी हे यूपीएससी, एमपीएससी मध्ये यशस्वी झालेले आपणास शंभर टक्के दिसतील.

  आदरणीय महादेवजी किरवले साहेब यांचे कार्य हे एका अत्यंत महान व उच्च कोटीच्या फुले, शाहू, आंबेडकर चळवळीच्या विचारधारेवर आधारित असलेलं समतेचे न्यायाचं, बंधुत्वाचं अधिष्ठान असलेलं वैचारिक व्यासपीठ म्हणजेच आदरणीय महादेवजी किरवले. आदरणीय महादेवजी किरवले म्हणजे एक चालतं बोलतं माणुसकीचे विद्यापीठ. आदरणीय महादेव किरवले म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. महादेव किरवले म्हणजे दीनदलीत, पद दलित, कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उचलणारा एक प्रशासकीय अधिकारी. सामाजिक प्रगती झाली पाहिजे समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. समाजातल्या अंधश्रद्धा वाईट चाली रीती वाईट परंपरा त्या नष्ट झाल्या पाहिजे. त्या घालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची कास धरली पाहिजे. या मताचा दलित समाजातील प्रत्येक शिक्षित माणसाने आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेल्या माणसाने ज्याची चांगली परिस्थिती निर्माण झालेली अशी या माणसाने समाजाला 20 टक्के दान दिले पाहिजे.

   या मताचा जी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर मोठी झाली त्या माणसांनी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसू नये. समाजाच्या भल्यासाठी दिवस-रात्र एक करावा. या उद्धार मताचा आदरणीय महादेव किरवले यांच्या कार्याचा ठसा हा त्यांनी केलेल्या असंख्य व अगणित लोकांच्या कामातून उमटवलेला आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना अनेक गोरगरीब कष्टकरी असंख्य लोकांची अनेक कामे केलेली आहेत.

   सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारा एक निर्भीड अधिकारी, प्रत्येक माणसाला आपल्याच घरातील जवळचा व्यक्ती आहे असा वाटणारा माणूस. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या दुःखात निरासन करणारा आपुलकीचा माणूस फुले, शाहू, आंबेडकर चळवळीच्या विचारधारेसाठी अहोरात्र परिश्रम करणारा आपला माणूस. प्रत्येक व्यक्तीला आपलाच कोणीतरी आहे असं वाटणारा एकमेव. सीरसाळा परिसरातील आदर्श माणूस म्हणजेच आदरणीय महादेवजी किरवले. आदरणीय महादेवजी किरवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.

   त्यांचे आयुष्य हे प्रशासकीय सेवेत असंच एखाद्या चंद्रासारखं कलेकलेने वाढत जावो. प्रशासकीय सेवेत ते आणखीन फार मोठ्या पदावर विराजमान व्हावेत. शिरसाळा परिसरातील हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाला कराटणी देण्यासाठी भगवान गौतम बुद्ध त्यांना वैचारिक बळ देऊ अनेक लोकांच्या दुःखमय जीवनाला सुखमय करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहून जीवनभर त्यांनी अशीच गोरगरीब नातेवाईक मित्र आप्तसूरकीय यांना साथ देत राहो. फुले, शाहू, आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा हातभार नेहमीच आम्हाला, आमच्या पाठीमागे राहो हीच अपेक्षा. जय भीम. जय प्रबुद्ध भारत.

         दिलीप उजगरे
         प्रसिद्ध वकील, परळी-वै न्यायालय

Post a Comment

Previous Post Next Post