वृक्षांना राखी बांधून महिला महाविद्यालयाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश..!
सांस्कृतिक विभाग व विशाखा समितीचा अभिनव उपक्रम..!
गेवराई, दि. ३० प्रतिनिधी
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि विशाखा समितीच्या वतीने राखी पोर्णिमेनिमित्त अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊन त्या अंतर्गत विद्यार्थीनींनी परिसरातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यानिमित्ताने आयोजित 'रक्षाबंधन' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कांचन परळीकर या होत्या. महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बापू घोक्षे आणि विशाखा समितीच्या अध्यक्ष प्रा.डॉ.संगीता आहेर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, प्राचार्य डॉ.कांचन परळीकर यांच्या हस्ते औक्षण करून पुष्पमालेने वृक्षपूजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी परिसरातील वृक्ष आणि वेलींना राखी बांधून 'पर्यावरण संवर्धनाचा' संकल्प केला. रक्षाबंधन जसे प्रेम आणि रक्षणाचे प्रतिक मानले जाते, तसेच पर्यावरणावर प्रेम आणि त्याचे रक्षण करण्याचा संदेश यानिमित्ताने या विद्यार्थीनींनी दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतिक विभागाच्या प्रा.हिरा खरात यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विशाखा समितीच्या प्रा.डॉ.कल्पना घारगे यांनी केले तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभागाचे प्रा.बाबू वादे यांनी केले.
सण- उत्सवांच्या माध्यमांतून पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थीनींमध्ये रुजविणाऱ्या या अभिनव उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.कांचन परळीकर यांच्या मार्गदर्शनावरून सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.बापू घोक्षे, सदस्य प्रा.डॉ.तबस्सुम इनामदार, प्रा.रामहरी काकडे, प्रा.हिरा खरात, प्रा.बाबू वादे, विशाखा समितीच्या प्रमुख प्रा.डॉ.संगीता आहेर, सदस्य प्रा.डॉ.कल्पना घारगे, प्रा.हिरा खरात यांच्यासह प्रा.डॉ.प्रविण शिलेदार, प्रा.डॉ.नामदेव शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.





Post a Comment