मराठा क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषण व ठिय्या आंदोलनासह नवव्या दिवशी विविध पक्ष संघटनांचा वाढता पाठिंबा..!

मराठा क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषण व ठिय्या आंदोलनासह नवव्या दिवशी विविध पक्ष संघटनांचा वाढता पाठिंबा..!

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले व्यंकटेश शिंदे यांची चौथा दिवस प्रकृती खुप खालावलेली आहे..!


परळी वै. प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे, आंदोलने, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. तर 6 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास व्यंकटेश बाबुराव शिंदे हे बसले आहेत चौथ्या दिवशी वेंकटेश शिंदे यांची प्रकर्ती खूप घालवली असून प्रशासनाची उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दवाखान्यामध्ये रेफर होण्यासाठी वारंवार विनंती चालू आहे. या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दि 10 सप्टेंबर 2023 रोजी 9व्या दिवशी विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.

आंदोलनाच्या 9व्या दिवशी अप्पर उपजिल्हाधिकारी शरद झाडके, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार गोविंद पेदेवाड, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, मंडळ अधिकारी आर बी कोमटकर, या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलन स्थळी उपोषणकर्त्यांना रेफर करण्याची विनंती केली आहे पण उपोषण करताना यासाठी नकार दिला आहे. तसेच आंदोलन व उपोषणावर बारीक लक्ष ठेवून असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच आज नवव्या दिवशी आज सोमनाथ भोसले, वृक्षराज काळे, गोविंद काळे, रामेश्वर सोनवणे, बाबा सोनवणे, यशवंत सोनवणे,उमाजी काळे, राजेभाऊ राडकर, स्वप्नील काळे, महादेव काळे, सुधाकर सोनवणे, साईराज देशमुख, संजय कदम, विश्वनाथ गायकवाड, दीपक शिरसाट, गणपती कोरे, पांडुरंग जाधव, योगेश नानवटे, ज्ञानेश्वर काळे, अंगद काळे, विश्वनाथ सावंत, विशाल आव्हाड, दत्ता सपाटे, रामेश्वर साबळे, तुकाराम नरवडे, गोविंद काळे, बबलू मोरे, रोहित शिंदे, अक्षय सुधाकर, गणेश मस्के, नितीन आगाव, मुंजा हरी मुंडे, वसंत सूर्यवंशी, एन आर कोठावळे, मोहन सोळंके, राम सोळंके, धनंजय सोळंके, किरण सोळंके, संजय सोळंके, भगवान कदम, श्रीकांत सोळंके, संदिपान काळे, शिवाजी शिंदे, रामेश्वर कदम, वैभव सोळंके, सय्यद हनीफ, नरेश हलगे, प्रकाश मुंडे, दत्तात्रेय मोरे, पुरुषोत्तम चिलपिंपरे, कृष्णाजी देशमुख, उमेश राव वाघुलकर, नारायण सातपुते, सय्यद शेख, अफरोज कुरेशी, आसफाख कुरेशी, शेख जुबेर, प्रल्हाद साठे,मोहन राजमाने, पप्पू काळे, महादेव साबळे, विशाल आव्हाड, माऊली सपाटे, रामकिसन काळे, दीपक शिंदे, रवींद्र शिंदे ,प्रल्हाद सोळंके, यासह शेकडो खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी विविध पक्ष संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेटी दिली व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आपला पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post