उपोषणकर्ते रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक..!

उपोषणकर्ते रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक..!

उपोषणाला तालुक्यातुन मोठ्या प्रमाणानात पाठींबा..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील युवक रोहन गलांडे पाटील यांनी केज तहसीलदार यांना निवेदन देऊन काल उपोषणाला सुरुवात सुरुवात केली व आज दि.१४ सप्टेंबर रोजी उपोषणाचा पाचवा दीवस आहे.ग्रामपंचाय कार्यालय, ढाकेफळ, केवड ग्रामस्थांनी व ठाकरे शिवसेना नेते रामहरी कोल्हे, चिंचोली माळी येथील मुस्लिम बांधव, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे, जाधव जवळा ग्रामस्थ, मातंग समाजाच्या वतीने विठ्ठल झाडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडस, संभाजी ब्रिगेड चे नेते राहुल खोडस, ज्ञानज्योती क्लासेसचे संचालक अमोल कापसे, गावचे जेष्ठ नेते रामप्रभु राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.उत्तम खोडसे, पत्रकार श्रीराम तांदळे, सरपंच खंडु चौरे, चिंचोली माळी येथील माता माऊली, टाकळी ग्रामपंचायत वतीने श्रीकांत घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील, सामाजिक चळवळीतील हनुमंत भोसले सर, सुर्डी, सोनसांगवी ग्रामपंचायतच्या वतीने अभिषेक भिसे, नांदुरघाटचे लोकपत्रकार श्रीकांतराजे जाधव, ग्रामपंचायत दैठणा व ग्रामस्थांच्या वतीने, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना असे अनेक संघटना, ग्रामपंचायत,पक्षांनी यांनी चिंचोली माळी येथे उपोषणाला बसलेल्या रोहन गलांडे यांना निवेदनाद्वारे पाठींबा देण्यात आला तरी रोहन गलांडे यांनी असे म्हटले आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावुन मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषन करणार आहे. असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे. तरी सरकार मायबाप व प्रशासना ने या गोष्टीची दखल घेऊन सहकार्य करावे. हि माझ्या सर्व मराठा समाजाच्या वतीने कळकळीची नम्र विनंती आहे. रोहन गलांडे यांचा उपोषणाचा पाचवा दीवस असुन त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे तरी उपोषन काळामध्ये जर मला व माझ्या कुटुंबाला काही कमीजास्त झाले तर याला पुर्णपणे सरकार मायबाप व प्रशासण जबाबदार राहिल असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post