श्री संस्कार इंग्लिश स्कूल चा तिसरा पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

श्री संस्कार इंग्लिश स्कूल चा तिसरा पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या श्री संस्कार प्री इंग्लिश स्कूल चा तिसरा पालक मेळावा मंगळवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला. या विषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार सेवा भावी संस्था संचलित श्री संस्कार प्री-इंग्लिश स्कूल चा तिसरा पालक मेळावा व गोकुळाष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व पालकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षणा बरोबरच, सांस्कृतिक कार्यक्रम व डिजिटल प्रणाली वापरून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध राहु असे आश्वासन दिले.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य ह.भ.प.आबा महाराज मेहरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, मा.सरपंच सुनील बापू देशमुख, संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, रविकुमार गायकवाड यांच्या सह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका सीमा काळे, निलम जोगदंड, गायकवाड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम जोगदंड यांनी केले तर प्रास्ताविक सीमा काळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post