विविध सामाजिक उपक्रमाद्वारे डॉ.उत्तम खोडसे यांचा वाढदिवस साजरा..!

विविध सामाजिक उपक्रमाद्वारे डॉ.उत्तम खोडसे यांचा वाढदिवस साजरा..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज तालुक्यातील युसुफ वडगाव सर्कल मधील नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राजकीय क्षेत्रात नावारूपाला आलेले डॉ.उत्तम खोडसे यांचा वाढदिवस तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती ची जाणीव ठेवून वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमाद्वारे, केज येथील बोबडेवाडी रस्त्यालगत बापूसाहेब कराड यांनी चालू केलेल्या स्वामी समर्थ वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना फळे व ब्लॅंकेट चे वाटप करून व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून तर काही ठिकाणी केक कापून डॉक्टर खोडसे यांचा वाढदिवस दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा करण्यात आला.

यावेळी स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे संस्थापक बापू कराड यांनी वृद्धाश्रमाच्या वतीने डॉक्टर साहेबां चा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारण बाजूला ठेवून समाजकार्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर या नात्याने मला आश्रमातील आजी आजोबांची मोफत सेवा करण्याची संधी मिळावी असे भावनिक उद्गार राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर उत्तम खोडसे यांनी आपल्या मनातील भावना बोलताना व्यक्त केल्या , यावेळी छावा जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे, अभिजीत मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते खामकर, पत्रकार रविंद्र मेटे, पत्रकार ज्योतीराम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख तसलीम मॅडम व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post