कौडगाव (हूडा) फाटा येथे छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन..!

कौडगाव (हूडा) फाटा येथे छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन..!


परळी वैजनाथ प्रतिनिधी

तालुक्यातील कौडगाव हुडा फाटा येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पासून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु असून आज या आंदोलनाचा 56 वा दिवस आहे. दरम्यान मराठा आरक्षणास विरोध व बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या या आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी कौडगाव फाटा येथील आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसह सकल मराठा समाजबंधवांना मार्गदर्शन केले होते. मा.मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहित झालेले आंदोलनकर्ते आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
          
आंदोलना दरम्यान आज मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आज आंदोलनाला भेट देण्यासाठी सोनपेठ तालुक्यातून दत्ताजी उगले, पंजाबराव भोसले, दया भोसले, विकास फपाळ शिरसाळा येथून लखन गायकवाड, पृथ्वीराज उंबरे, परळी येथून दिनेश गजमल, ऍड. सतीशराव देशमुख, ऍड.संजयजी फुन्ने, ओमराजे काळे, एजाज शेख, कॉम्रेड बालाजी कडबाने, तालुका धारूर हिंगणी येथून शरद भाऊ सोळंके तसेच अंबाजोगाई तालुक्यातून शिवाजीराव कापसे मामा  यांच्यासह अनेक समाजबांधवांनी आंदोलनाला भेट दिली.

Post a Comment

Previous Post Next Post