मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून केले लक्षणीय उपोषण..!
उत्तरेश्वरी पिंपरी ग्रामस्थांनी दीला पाठिंबा..!
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे मराठा आरक्षण लढ्याचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी दिं. ८ ऑक्टोबर 2023 रविवार या दिवशी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणात सरपंच सचिन चंदनशिव यांच्या सह ग्रामस्थ सहभागी झाले, मंदिराच्या बाजूला सकाळी सकाळी १० वा. सदरिल उपोषण सुरु झाले, सध्या मराठा आरक्षण प्रश्न ठिक ठिकाणी उपोषणे चालू आहेत. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी या गावात सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालू आहे , या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक दिवसाचे लक्षणीय उपोषण केले जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालय केज यांना
निवेदन दिलेले होते. मराठा समाजाची शैक्षणिक व आर्थिक स्थिती खालावलेली आहे तरी मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षणाची नितांत गरज आहे यासाठी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणा संदर्भात अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठींबा म्हणून याच अनुषंगाने केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील विद्यार्थी, महिला, युवक व जेष्ठ नागरिक या उपोषणाला बसले आहेत.




Post a Comment