मजबूत संघटन बांधणी हेच शिवसेनेचं वैशिष्ट्य-व्यंकटेश शिंदे..

मजबूत संघटन बांधणी हेच शिवसेनेचं वैशिष्ट्य-व्यंकटेश शिंदे..


परळी वै. प्रतिनिधी

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सर्व सामन्याचा आवाज बुलंद ठेवणारी शिवसेना परळी तालुक्यात मजबूत झाली पाहिजे यासाठी शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, शिवदूत, रिक्त जागेवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील कारण मजबूत संघटन बांधणी हेच शिवसेनेचं वैशिष्ट्य असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे.
   
दि.१२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक याठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आदेशावरून, लोकसभा प्रमुख डॉ विजय पाटील, जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजा भैय्या पांडे, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली. 

नवनिर्वाचित उपजिल्हा प्रमुख राजा भैय्या पांडे, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने, संतोष चौधरी, शिवसेना तालुका सचिव विश्वनाथ राठोड, महिला आघाडीच्या तालुका संघटिका यशोदा ताई राठोड, दीपक शिंदे, डॉ.जे.एन.शेख, सुदर्शन यादव, मोहन राजमाने, उमेश सोळंके, आनंद शिंदे, कृष्णा सुरवसे, बाबा सोनवणे, नागेश मुरकुटे, राम किर्दंत, पृथ्वीराज उंबरे, तुकाराम नरवाडे, संपत शिंदे, गोविंद गरड, राजेश शिंदे, अतुल शिंदे, उपशहर प्रमुख बाळासाहेब खोसे, विठल गायकवाड, शहर संघटक सचिन सोनवणे, विश्वनाथ पंजरकर, विठल गायकवाड, शहर सचिव सय्यद निसार अली, विष्णु ढेंबरे, उपतालुका प्रमूख सुंदर रवळे, मुंजा गायकवाड, गौरव क्षीरसागर, अरुण माने, विशाल शिंदे, नरसिंग पौळ, अमोल गायकवाड शिवहार जाधव, किशोर कापसे, नितीन पौळ मोहिनी कांबळे, शितल सतभाई, गवळण बदने, पद्मिनी गिरी यांच्या सह आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post