शिवसेनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविक भक्तांना फराळी चिवडा व थंड पेय जलाचे वाटप..
परळी प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तासाठी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे यांच्या वतीने वैद्यनाथ मंदीर जवळ फराळी चिवडा व थंड पेय जलाची व्यवस्था करण्यात आली होती.
महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून सर्वश्रुत असलेल्या परळीच्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक भक्त येत असतात. आलेल्या भाविक भक्ता साठी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे यांनी परळी नगर परिषदेच्या बाजूला फराळी चिवडा व थंड गार पेय जलाची व्यवस्था केली होती. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजा भैय्या पांडे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे, दीपक शिंदे, संतोष चौधरी, मोहन राजमाने, कृष्णा सुरवसे, तुकाराम नरवाडे, सुदर्शन यादव, आनंद शिंदे, राजेश शिंदे, गोविंद गरड, नरसिंग पौळ, गोविंद सूर्यवंशी, नितीन पौळ, शिवहरी जाधव, संदीप चापके, ज्ञानेश्वर पौळ, विश्वनाथ सावंत, सुदाम शिंदे, किशोर कापसे, विशाल शिंदे, बालाजी नळगे, मुंजा गायकवाड, आकाश आंबिलवादे, आदि शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment