वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार..
परळी शहरातून हजारो युवक कार्यकर्ते जाणार -प्रेम जगतकर..
परळी प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार तथा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांचा आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा निरीक्षक प्राध्यापक किसन चव्हाण सर वंचित बहुजन आघाडीची बीड जिल्हा कार्यकारणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उमेदवारी दाखल करणारा असून या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा रॅली परळी शहरातून हजारो युवक जाणार असून अभी नही तो कभी नही असा नारा देत सर्व युवक एकवटले असून अशोक भाऊ हिंगे पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार परळी तालुक्यातून केला असून गेल्या पंधरा दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व बालासाहेब जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यात एक फेरी पूर्ण झाली असून वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित मानला जात असून या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा सम्यक विद्यार्थी आंदोलन समता सैनिक दल वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी हितचिंतकांनी उपस्थित रहावे असेही आव्हान वंचित बहुजन युवक आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केली आहे.




Post a Comment