महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणेची निवडणूक जनतेनेच हाती घेतली-भाई मोहन गुंड..

महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणेची निवडणूक जनतेनेच हाती घेतली-भाई मोहन गुंड..

बप्पाना मतदान रुपी आशीर्वाद द्या-सौरव सोणवणेज्ञ..


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

बीड लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी चे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारर्थ केज तालुक्यातील लव्हरी कोल्हेवाडी तरनळी साबला धर्माळा या गावात बैठका घेण्यात आल्या. यावेळी येडेश्वरी साखर कारखान्यासारखे इतर ही युनिट आपण उभ करण्याचा प्रयत्न करू तरुणांच्या हाताला काम देऊ, बजरंग बप्पांना मतदान रूपी आशीर्वाद द्या आम्ही कधीही विसरणार नाही अशी विनंती सौरव सोनवणे यांनी केली.


जिल्ह्यामध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गामध्ये भाजप विरोधी खूप मोठा रोष निर्माण झाला आहे गेली, दहा वर्षापासून फक्त भांडवलदार पोसण्याचं काम या भाजपकडून होताना दिसत आहे आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाला मात्र वेठीस धरत आहे, गेली दहा वर्षांमध्ये पिक विम्याचे प्रश्न असतील अतिवृष्टीचे अनुदानाचे असतील फळबागाच्या असतील अनेक प्रश्नावर भाजप उदासीन आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या असून मागील दहा वर्षात बीडच्या खासदाराने चक्र शब्द काढला नाही. याचा प्रचंड रोष असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांची निवडणूक सर्वसामान्य माणसाने हाती घेतली असल्याने त्यांचा विजय कोणी रोखू शकत नसल्याचे मत प्रचार दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केला यावेळी सौरव बजरंग सोनवणे मुन्ना चाळक, पिंटु मस्के, बप्पा डोंगरे बालाजी सोनवणे, सह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post