साबला येथे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांची जयंती साजरी करण्यात आली..

साबला येथे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांची जयंती साजरी करण्यात आली..


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

"पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर" यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जनाबाई नरहरी काकडे सरपंच साबला. व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" पुरस्कार सन-2023-2024 सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आपला ग्रामपंचायत स्तरीय "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" श्रीमती कलावती हनुमंत नाईकनवरे माजी सरपंच साबला व श्रीमती दैवशाला पांडुरंग काकडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती. जनाबाई नरहरी काकडे सरपंच साबला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ग्रामविकास अधिकारी श्रीमान धनराज सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्या श्रीमती आशाबाई श्रीमंत काकडे, श्रीमती प्रतिभा पोपट काकडे, श्रीमती पार्वती महादेव नाईकनवरेे, श्रीमान ज्ञानेश्वर श्रीकृष्ण पांचाळ, श्रीमान पवन राजेंद्र सरवदे उपसरपंच साबला. यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.


           या कार्यक्रमास उपस्थित आदर्श शिक्षक नरहरी शहाजी काकडे, पोपट विश्वांभर काकडे, राहुल गुलाब मुळे, ईश्वर पांडुरंग काकडे, काशिनाथ गोवर्धन नाईकनवरे, अंकुश पांडुरंग काकडे, आश्रुबा जनार्धन नाईकनवरे, वसंत महादेव नाईकनवरे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक नरहरी शहाजी काकडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post