प्रभागातील अर्धवट कामे पूर्ण करून प्रभागाला खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणूक लढवणार-राजकुमार डाके..
परळी प्रतिनिधी
सावता माळी मंदिर परिसरात वसलेल्या कृष्णा नगर कीर्ती नगर गंगासागर नगर खंडोबा नगर सिद्धेश्वर नगर आदी भागात गेल्या पन्नास वर्षापासून लोक वास्तव्यास आहेत परंतु अद्यापही या परिसरात खऱ्या अर्थाने विकास झालेला नसून प्रत्येक कामे ही अर्धवट अवस्थेत राहिल्याने या परिसरातील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो नागरिकांची ही दयनीय अवस्था बदलण्यासाठी आपण येत्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकतीनिशी प्रभागातील जनतेच्या आशीर्वादाने नगरपरिषद निवडणूक लढवून विजयी होऊन या प्रभागाचा विकास या प्रभागातील जनतेला बहाल करणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
आपण स्वतः सावता माळी मंदिर परिसरात राहात असल्यामुळे या भागातील नागरिकांशी आपले नाळ घट्ट जोडल्या गेल्यामुळे या भागातील सामान्य कष्टकरी जनतेच्या हाल अपेष्टा आपण जवळून पाहिले आहेत या परिसरात कष्टकरी मोलमजूर करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो या परिसरात अद्याप पर्यंत म्हणावा तसा विकास झालेला नसून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व या परिसरातील लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे परिसरात अनेक अवैद्य धंदे बोकाळले आहेत अवैध धंद्यामुळे परिसरातील शालेय विद्यार्थिनी महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेक वेळा आपण या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलने सुद्धा उभारली आहेत. या प्रकाराला कंटाळून परिसरातील नागरिकांनी या परिसरातीलच सामान्य कुटुंबातील व्यक्तीला यावेळी निवडून देण्याचा एकमुखी निर्धार मतदारांनी केला असून आपण गेल्या पंचवीस वर्षापासून सतत परिसरातील जनसामान्य नागरिकांच्या सोबत राहून सुखदुःखात सक्रिय सहभाग नोंदवत त्यांच्या अडचणी सोडवल्यामुळे मतदारांच्या आग्रहाखातर व त्यांच्या सहकार्यावरच आपण येत्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जे कोणती जागा वाट्याला येईल त्या जागेवर आपण पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवून येणाऱ्या भविष्यकाळात या परिसरातील नागरिकांना स्वच्छ सुंदर निर्भय व विकसित प्रभाग बनवून दाखवण्याचा संकल्प केला आहे. 2016 च्या नगरपरिष निवडणुकीवेळी साहेबांनी मला नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते साहेब हे शब्द पाळणारा पैकी असल्यामुळे यावेळी मला साहेब नक्कीच संधी देतील या संधीचा मी जनतेच्या विकासासाठी उपयोग करणार आहे. प्रभाग क्रमांक सहा मधील साहेब ज्या प्रवर्गातून लढण्या साठी आदेश देतील त्या प्रवर्गातून (ओपन पुरुष अथवा ओबीसी महिला) जागावाटप वाटाघाटी मध्ये जी कोणती जागा साहेबांच्या वाट्याला येईल त्या जागेवर आपण लढण्यास तयार असल्याचा निर्धार राजकुमार डाके यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment