शिक्षक साहित्य संमेलनात बुक स्टॉल व सेल्फी पॉईंट ठरणार खास आकर्षणाचे केंद्र..

शिक्षक साहित्य संमेलनात बुक स्टॉल व सेल्फी पॉईंट ठरणार खास आकर्षणाचे केंद्र..



परळी.वै.प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथे 16 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात बुक स्टॉल व खास शिक्षक व साहित्यिकांसाठी उभा करण्यात येणारा सेल्फी पॉईंट  खास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.



शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर  जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात रविवार,दिनांक 16  नोव्हेंबर 2025 रोजी सातवे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते होणार आहे.संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले तर स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे हे आहेत. शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा व शिक्षक गौरव पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. तसेच दिवसभर परिसंवाद कथाकथन आणि कवी संमेलन असे विविध सत्रात कार्यक्रम होतील.


उद्घाटन समारंभात उत्कृष्ट चित्रकला शिक्षक व प्रसिद्ध कवी सिद्धेश्वर इंगोले यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिक्षकांच्या विविध गुणधर्माचे दर्शन घडविणारा सेल्फी पॉइंट याचे उद्घाटन होणार आहे. शिक्षक साहित्य संमेलनात येणारे साहित्यिक, शिक्षक, साहित्यरसिक, परळीकर यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post