महातपुरी येथील ज्ञानेश्वर सोनकांबळे यांचे निधन..
ताडकळस प्रतिनिधी
ताडकळस येथुन जवळच असलेल्या महातपुरी येथील ज्ञानेश्वर मल्हारी सोनकांबळे यांचे अल्पशा आजाराने सोमवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४० वर्षे होते .पत्रकार सचिन सोनकांबळे, चंद्रशेखर सोनकांबळे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, वडील, भाऊ, नातू असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा महातपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, पत्रकार, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment