परळीत काँग्रेस–वंचित आघाडीच्या प्रचाराचा आज होणार भव्य शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा होणार शुभारंभ..

परळीत काँग्रेस–वंचित आघाडीच्या प्रचाराचा आज होणार भव्य शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा होणार शुभारंभ..


काँग्रेस- वंचित बहुजन आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे- काँग्रेसचे अध्यक्ष-ॲड.प्रकाश मुंडे..



परळी वैद्यनाथ प्रतिनिधी

परळी नगरपरिषद निवडणुकीची वातावरणनिर्मिती जोर धरत असताना, काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी आज आपल्या प्रचार मोहिमेचा दणदणीत शुभारंभ करणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा प्रचार आज सकाळी ११ वाजता मोंढा मार्केट येथे सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम परळीत मोठे राजकीय आकर्षण ठरणार आहे. तरी परळी शहरातील मतदार बांधवांनी व नागरिकांनी मोठी संख्येने उपस्थित राहावे- काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांनी केले आहे. 

परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवार,दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईगळ ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे,  काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रचार शुभारंभासाठी शहरातील कार्यकर्त्यांत आणि समर्थकांत मोठा उत्साह आहे.प्रचाराच्या उद्घाटनावेळी काँग्रेस–वंचित आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात येणार आहे. परळीतील आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना वेगळेच वजन आणि दिशादर्शन मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विजयाच्या तयारीत काँग्रेस–वंचित आघाडी परळी नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी संयुक्त लढत जाहीर केली आहे. तरुणाईपासून ज्येष्ठ मतदारांपर्यंत या आघाडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.“परळी शहरातील सर्व नागरिकांनी आणि सुजाण मतदारांनी या भव्य प्रचार शुभारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे,” असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांनी केले आहे. परळीत निवडणूक रंगत आणखी वाढवणार असून, काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या शक्तिप्रदर्शनाचा निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या प्रचार शुभारंभाच्या होणाऱ्या  कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post