परळी नगर पालिका प्रशासनास शहरातील महत्वाच्या प्रश्नाचा विसर..
उद्यानासह रस्त्यावरील वाळत असलेल्या झाडांना पाणी कधी देणार.?-सेवकराम जाधव..
परळी वैजनाथ
राजमाता जिजामाता उद्यानातील तसेच एकमिनार चौक ते डॉ.अब्दुल कलाम चौक पासून ते संत जगमित्र नागा मंदिर या रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडे पाण्यावाचून अक्षरशः वाळून जात आहेत. हे नगर पालिका प्रशासनास का दिसत नसेल ? या झाडांना पाणी कधी देणार ? असा संतप्त सवाल सेवकराम जाधव यांनी केला आहे.
निवडणूक झाली मतदान मशीन नगर पालिका कर्यालयात जमा आहेत. म्हणून शहरातील बाकीच्या बाबींकडे लक्षच द्यायचे नसते अशा अविर्भावात नगर पालिका प्रशासन दिसून येतं आहे. शहराचे वैभव असलेले राजमाता जिजामाता गार्डन येथील हराळी सह छोटी मोठी झाडें पाण्यावाचून वाळून जात आहेत. त्याच बरोबर परळी शहरातील एकमिनार चौक ते डॉ. अब्दुल कलाम चौक इथं पासून ते संत जगमित्र नागा मंदिर पर्यंत रस्त्याच्या मधोमध लावलेली सम्पूर्ण झाडे ही पाण्यावाचून वाळुन जात आहेत. या झाडांना नगर पालिका प्रशासनाने तात्काळ पाणी द्यावे. जेणेकरून लाखो रुपये खर्च करून लावलेली ही झाडे वाळुन जाण्यापासून वाचतील. नगर पालिका प्रशासनाने दोन चार दिवसात सदरील झाडांना पाणी नाही दिले तर आपण नगर पालिकेच्या दारात आंदोलन करणार असल्याचे मराठावाडा प्रबोधन मंचचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.


Post a Comment