आदर्श पुरस्कार प्राप्त पत्रकार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे

आदर्श पुरस्कार प्राप्त पत्रकार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे

आज दि.६ मे २००० हा त्यांचा जन्मदिवस..,
व त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मी घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...



पत्रकार सचिन सोनकांबळे यांचा जन्म ६ मे २००० रोजी माता गवळणबाई व पिता ज्ञानेश्वर यांच्या पोटी एका छोट्याशा खेडेगावात, महातपुरी ता.पुर्णा येथे झाला. पुढे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडकळस येथे झाले. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती तरीही त्यांनी हार मानली नाही. त्या नंतर त्यांची बारावी श्री. नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय ताडकळस येथे झाली आणि बघता बघता त्यांनी BA मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण चालू असलं तरी गोरगरिबांच्या व्यथा त्यांना ऐकून घेण्यात आणि त्यावर मदतरुपी मलम लावण्यात लहानपणापासूनच रस होता. सहाजिकच मत मांडण्याकडे त्यांचा कल आपोआप वाढला नि नकळत लेखनीशी जवळीक वाढली. मग काय..,याच लेखणीचं बोट धरून ते केवळ एक काम नाही तर छंद म्हणून पत्रकारितेकडे वळले.

पुढे परभणी जिल्हा प्रतिनिधी ' दैनिक सोमेश्वर साथी' साठी त्यांना पद मिळाले. जे आजही जोमाने समाजामध्ये स्वतःची एक वेगळी छाप पाडून आहे. आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळणं यालाही नसीबच लागते. सचिन सर आजही आपल्या लेखणीचं बोट धरून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचत आहेत. व लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. सत्कार, सन्मान आपल्या बातमीद्वारे फुलवत आहेत. समस्या, व्यथाही मांडून सहकार्यरूपी समाजाची निस्वार्थ मदत करत आहे. याचा त्यांच्या संपूर्ण परिवाराला सार्थ अभिमान आहे. 

सचिन सोनकांबळे हे पत्रकारिता आज जवळजवळ २०१७ पासून सांभाळत आहेत. त्यांनी ' आवाज परभणीचा' या न्यूज चैनलपासून ते नंतर ' दैनिक सोमेश्वर साथी' या पेपरचे काम करत आहेत. या क्षेत्रातला ना कुठला वारसा, ना भरगच्च पाठीमागे संपत्ती पण प्रामाणिकतेच्या जोरावर हे कार्य ते आजही तंतोतंत पार पाडताना दिसत आहेत. आणि याचंच फळ म्हणून त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय ' आदर्श पत्रकारिता', व ' महाराष्ट्र रत्न पुरस्कार' प्राप्त असे अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. खरंच कष्ट करण्याची तयारी असेल तर यश अगदी हाताच्या अंतरावर भेटतं म्हणतात ते काही खोटं नाही. अत्यंत हालाकीतून वर आलेल्या या सोनकांबळे परिवारासाठी सचिन सर हे आदर्श जपणारे एक गुणी व्यक्तिमत्व म्हणून आज समाजात प्रसिद्ध आहे. 

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि प्रामाणिक प्रवासाचा मी घेतलेला अगदी थोडक्यात म्हणजे अगदीच अल्प आढावा होय. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता अशीच पुढल्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत राहो याच शुभेच्छारुपी शब्दांनी मी माझ्या दोन शब्दांना पूर्णविराम देते...


लेखिका
कविता पाचंग्रे
पुणे


Post a Comment

Previous Post Next Post