संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व ॲड.कान्हा केंद्रे यांची प्रेरणादायी यशोगाथा..!

संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व ॲड.कान्हा केंद्रे यांची प्रेरणादायी यशोगाथा..!




परळी-वै..प्रतिनिधी

"संघर्षाशिवाय यश नाही" या म्हणीचा प्रत्यय देणारे नाव म्हणजे ॲड.कान्हा केंद्रे. अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या जीवनाची सुरुवात करत त्यांनी मालवाहू ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह केला. कष्टाची लाज न बाळगता दिवस-रात्र मेहनत घेत त्यांनी आपल्या शिक्षणाचे स्वप्न जिवंत ठेवले.

एका हातात ऑटोचे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात शिक्षणाची जिद्द घेऊन त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले. आर्थिक अडचणी, सामाजिक आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि अखेर वकिलीचे स्वप्न साकार करत "ॲड.कान्हा केंद्रे" अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, प्रामाणिक मेहनत आणि शिक्षणाची जिद्द असेल, तर यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.

आज ॲड.कान्हा केंद्रे यांचे नाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मालवाहू ऑटो रिक्षा चालवणाऱ्या तरुणापासून यशस्वी वकील होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, आत्मविश्वास आणि जिद्दीचा प्रेरणादायी इतिहास आहे.

Post a Comment

Previous Post Next Post