फसवे कॉल व सोशल मीडिया पासून सावधान..!
विशेष प्रतिनिधी पदमाकर उखळीकर
सध्या डिजिटल माध्यम वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतू याचा धोका होऊ शकतो, याची प्रचिती परळी येथील एका इसमास आली आहे. कारण त्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करून, त्यावरून न्यूड फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच वेगवेगळे व्हिडिओ आणि बनावट नग्न फोटो तयार करून सोशल मीडियातील मित्रांना तसेच सार्वजनिक रित्या व्हायरल करू असे व्हाट्सअप नंबरवर मेसेज येत आहेत. याबद्दल त्या व्यक्तीने रीतसर सायबर गुन्ह्याखाली गुन्ह्याची नोंद केली असून, याबाबत पोलीस प्रशासन यांनी व्हाट्सअप वर रिपोर्ट टाकून तसेच फेसबुकवर हरास्मेंट रिपोर्ट टाकून आरोपी विरुद्ध सोशल मीडिया कंपनीकडे रीतसर तक्रार केली आहे.
तरी शहरातील नागरिकांनी सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना, आपल्या सोशल मीडियातील अकाउंटचे वेळोवेळी पासवर्ड बदलावेत. तसेच अकाउंट हॅक झाले असेल तर पोलीस प्रशासनाला तत्काळ कळवावे. तसेच फसवणुकीचे अनेक कॉल अनेक व्यक्तींना आले आहेत. प्रथमता कॉल वर बोलणारी व्यक्ती कोणतेही आर्थिक अडचणीचे कारण सांगून पैशाची मागणी करीत आहेत. पैशाचे मागणे केल्यानंतर प्रतिसाद समोरील व्यक्तीकडून नाही आल्यास व्हिडिओ व्हायरल करू असे मेसेज व फोन द्वारे त्या व्यक्तीला छळवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे अशा फसव्या कॉल पासून व लुटमार करणारे व्यक्तीकडून सावध राहण्यासाठी सतर्क राहून तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे.
थोडक्यात हॅकर्स म्हणजे काय.?
डेटामध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्यासाठी संगणक वापरणारी व्यक्ती. एक उत्साही आणि कुशल संगणक प्रोग्रामर किंवा वापरकर्ता. एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जी जवळजवळ हॅक करते किंवा कट करते. एखादी व्यक्ती जी संगणक प्रोग्राम बेकायदेशीरपणे वापरण्याची रचना करतात. संगणक नेटवर्क किंवा संगणकांमध्ये घुसखोरी करणारे आणि माहिती चोरणारे सायबर हेर. संगणक हॅकर म्हणजे कॉम्प्यूटर प्रोग्रामची कार्यप्रणाली आणि रचना यांचे चांगले संगणक ज्ञान आणि अस्सल ज्ञान असलेली व्यक्ती ज्याला वेबसाइटचा सुरक्षा उल्लंघन सापडतो आणि तो निराकरण करतो.




Post a Comment