संस्कार प्राथमिक शाळेत ''RED DAY'' सेलिब्रेशन हा नवीन उपक्रम संपन्न..!

संस्कार प्राथमिक शाळेत ''RED DAY'' सेलिब्रेशन  हा नवीन उपक्रम संपन्न..!


पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले..!


परळी विशेष प्रतिनिधी पदमाकर उखळीकर

विद्यानगर येथील संस्कार प्राथमिक शाळेत नुकताच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 'RED DAY' साजरा करण्यात आला. लाल रंग दिवसानिमित्त सेलिब्रेशन करण्यात आले. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे, स्वतःचे मूल्य आहे आणि स्वतःची कथा आहे .उदाहरणार्थ - पांढरा: शांतता आणि सुसंवादाचा रंग आहे. आणि त्याचप्रमाणे लाल रंगाचे अनेक महत्त्व आहे, जसे लाल रंगात प्रेमाचा रंग आणि रक्ताचा रंग आहे. रक्ताचा रंग धोक्याचेच नव्हे तर त्याग आणि धैर्य देखील दर्शवतो. प्री-स्कूल आणि किंडरगार्डन्समध्ये वेगवेगळ्या रंगांचे दिवस साजरे करण्याचा ट्रेंड आहे.

म्हणून शहरातील विद्यानगर विभागातील संस्कार प्राथमिक शाळेत नवीन उपक्रम रेड डे साजरा करण्यात आला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या लहान मुलांनी लाल व पोशाखा मध्ये तसेच शिक्षकही लाल पोशाख परिधान करून आले होते. लाल, म्हटल्याप्रमाणे, धोका, त्याग आणि धैर्याचा रंग आहे. लाल दिवसाच्या उत्सवासाठी शाळेमध्ये लाल रंगांच्या रांगोळीने मिकी माऊस चित्र, लाल रंगाचे फुगे, फुले आदींनी शाळा लाल रंगाने रंगवण्यात आली होती. लहान मुलांमध्ये सर्जनशीलता निश्चितपणा, निष्पाप, आनंद, मजा आणि आनंदाची चमक चेहऱ्यावर  होती. शाळेतील हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी या नवीन उपक्रमाचे कौतुक केले. तसेच पालकांनी सुध्दा कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि उत्साह दिसून येत होता. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी लाल रंगाचे गिफ्ट वाटप केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post