श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी निमित्त श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूलच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम..!

श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी निमित्त श्री.संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूलच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री.संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी दहा वाजता येतील श्री.संत नामदेव महाराज सभागृहात जनविकास सेवाभावी संस्थेचे मा.श्री‌.रमेश भिसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.आबा महाराज मेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


श्री.संस्कार, प्री.प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी व केज येथील गार्गी तात्या गवळी यांनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गवळणी व इतर गीतावर ढंगदार शैलीत नृत्य सादर केले. यावेळी गावातील नागरिकांनी संस्थेचे व शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास सेवाभावी संस्थेचे मा.श्री.रमेश भिसे साहेब हे होते तर प्रमुख उपस्थिती सर्वश्री सरपंच सुनील बापू देशमुख, शिवाजी आबा गायकवाड, शहाजी आप्पा गलांडे, भारत आण्णा गालफाडे, डॉ.महादेव सांगळे वैद्यकीय अधिकारी चिंचोली माळी, सुधाकर ढाकणे मुख्याध्यापक जि.प.शाळा, आबा महाराज मेहकर, संजय महाराज नखाते, चंद्रकांत भुजबळ, पांडुरंग गलांडे, पत्रकार तात्या गवळी, ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड जनक गलांडे, अविनाश नखाते, जालींदर गलांडे, रामराजे गलांडे, पेपंकज भिसे, मच्छिंद्र लांडगे, शिक्षिका नीलम पवार सीमा काळे यांच्यासह गावातील नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलम मॅडम, सीमा काळे मॅडम व आकांक्षा गालफाडे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा काळे व नीलम पवार यांनी केले तर प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले व आभार प्रदर्शन शहाजी आप्पा गलांडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासाठी जीवनभर संघर्ष केलेले, स्वर्गीय मा.आमदार विनायक मेटे यांना व चिंचोली माळी येथील अपघातात मृत्यू पावलेले संदिप श्रावण घोडके, प्रकाश साहेबराव घोडके यांना गावकऱ्यांनी सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

Previous Post Next Post