शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष मा.आ.कै.विनायकरावजी मेटे साहेब यांना परळी येथे सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली..!
विवीध पक्ष, संघटना, वकील संघ, पत्रकार संघ, व्यापारी संघ, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती..!
परळी वैजनाथ प्रतिनिधी
शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष मा.आ.कै.विनायकरावजी मेटे साहेब यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात सर्व राजकीय, सामाजिक, सामाजीक, क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. मागच्या 30 वर्षाचा मेटे साहेबांचा राजकीय प्रवास, सामाजिक कार्य, साहेबांसोबत घालवलेले क्षण, मेटे साहेबांनी केलेली कामे यासह विविध आठवणींवर कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले.
मेटे साहेबांचे मराठा आरक्षण, विविध धर्मीय सामूहिक विवाह सोहळे, व्यसनमुक्तीसाठीचे योगदान, यावर अनेकांनी प्रकाश टाकला.साहेबांचे सामाजिक कार्य व विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. मराठा समाजाला राजकीय आरक्षण देऊन सरकारने मेटे साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी. अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच ऐतिहासिक असा शिवस्मारकाचा प्रश्न प्रलंबित न ठेवता तात्काळ त्या कामाला गती देण्यात यावी. हीच मेटे साहेबांना खरी श्रद्धांजली राहील अशीही अनेक मान्यवरांनी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी शिवसंग्राम, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारतीय किसान काँग्रेस, मराठा महासंघ, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, किसान काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कामगार आघाडी, इंटक, चर्मकार महासंघ, संगणक परिचारक संघटना, परळी वकील संघ, परळी पत्रकार संघ, व्यापारी महासंघ, परळी डॉक्टर असोसिएशन, मराठवाडा शिक्षक संघ, शिवक्रांती सेना, वैद्यनाथ बँक, दीनदयाळ बँक, जागृती पतसंस्था यासह परळी शहरातील व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, पतसंस्था, पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत मा.आ.कै.विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.





Post a Comment