केज येथे होणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-ह.भ.प.केशव महाराज शास्त्री..!

केज येथे होणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-ह.भ.प.केशव महाराज शास्त्री..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज येथे सोमवार दि. 30 जानेवारी ते रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 या काळात पंचायत समिती मैदानात भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.


याविषयी सविस्तर वृत्त असे की केज येथील पंचायत समितीच्या मैदानात भागवत भूषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आश्रम केज यांच्या सुश्राव्य वाणीतून सोमवार दि. 30 जानेवारी ते रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 या काळात भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन केले आहे तरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भागवत भूषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या शामियान्याचे उद्घाटन शनिवारी दुपारी ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे, उपाध्यक्ष सचिन साखरे, सचिव श्रीराम तांदळे, कोषाध्यक्ष बाबासाहेब मस्के, सदस्य गणेश सत्वधर, रोहन गलांडे, वाजेद शेख, जेष्ठ समाजसेवक हनुमंत भोसले यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post