कै.मधूकरराव श्रीधरराव शिनगारे पुण्यतिथी निमित्त आरोग्य तपासणी शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद..!

कै.मधूकरराव श्रीधरराव शिनगारे पुण्यतिथी निमित्त आरोग्य तपासणी शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद..!


किल्ले धारूर ॲड.युवराज फुन्ने

धारुर शहरातील आडत व्यापारी कै.मधुकरराव शिनगारे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ३७० रुग्णांची तपासणी व ३० रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     धारुर शहरातील आडत व्यापारी तथा संचालक संदिप भैय्या शिनगारे व कर सल्लागार श्रीकृष्ण शिनगारे यांनी त्यांचे वडील कै.मधुकरराव श्रीधरराव शिनगारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीहर्ष प्रतिष्ठाण धारुर व स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर संपन्न झाले.
     महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरिचे उद्घाटन युवा नेते ऋषिकेश आडसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श सेवा निवृत्त शिक्षक संभाजीराव आप्पा शिनगारे, सभापती मंगेश तोंडे, उपसभापती सुनिल शिनगारे, सचिव दत्तात्रय सोळंके, नेत्र तज्ञ डॉ.एकनाथ शेळके, डॉ.चेतन आदमाने, जेष्ठ पत्रकार अनिल महाजन, सचिन थोरात, अशोक दरेकर, नितीन शिनगारे, सिद्धेश्वर रणदिवे, ॲड.मोहन भोसले, अंकुशराव जगताप, सुर्यकांत जगताप, विजयसिंह दिख्खत इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या शिबिरात शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत शुभेच्छा दिल्या.

     यावेळी उद्घाटक युवा नेते ऋषिकेश आडसकर, अनिल महाजन, संभाजीराव आप्पा शिनगारे, सुरेश शिनगारे, संदिप शिनगारे यांनी मनोगत व्यक्त करत कै.मधुकर आण्णा शिनगारे यांच्या प्रती आठवणी जाग्या केल्या.

    आरोग्य शिबीरात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.नागेश मलुरी, डॉ.संकेत निसाले, डॉ.राजप्रताप राठोड, डॉ.प्रणव, डॉ.प्रतिमा महावले, डॉ.अरविंद निक्ते,औषध पुरवठा प्रशांत पुरणवाड, गणेश पवार, गोविंद गायकवाड, निलेश फड यांनी यावेळी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात गरजु रुग्णांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

      या शिबिरात 370 रुग्णांची तपासणी केली व जवळपास 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कै.मधुकरराव शिनगारे यांच्या पुण्यतिथी निमित्त छाया मधुकरराव शिनगारे , भागवतराव जगताप, दिगांबरराव माने, आबासाहेब सुर्यवंशी, डॉ.परमेश्वर सुर्यवंशी, सुभाषराव गोरे, दामोधर आण्णा शिनगारे, विजय गायकवाड, संजय शिनगारे, दादाराव शिनगारे, विनायक शिनगारे यांची उपस्थिती होती.

    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुरेश शिनगारे, दिनेश कापसे, विजय शिनगारे, राहुल तोष्णिवाल, जनक फुन्ने, आनंद चिद्रवार, बालाजी पिलाजी, प्रा.नारायण शिनगारे, विनायक दादा शिनगारे, ॲड.परमेश्वर शिनगारे, अमोल नवघरे, वैभव रंदवे, योगेश्वर नखाते, शिवराज शिनगारे, निलेश शिनगारे, अजय पुजदेकर, सोमनाथ शिनगारे, भगवानराव फुन्ने, विश्वास शिनगारे, गणेश देशपांडे, प्रमोद शिनगारे, प्रशांत शिनगारे, धनंजय शिनगारे, राजु शिनगारे, बप्पासाहेब उकंडे, विश्वानंद तोष्णिवाल, भागवत लांडगे, निखिल पाथरकर, बंडु काका तोडकर, प्रशांत डुबे, सुभाष पवार, शिवाजीराव ठोंबरे, श्रीनिवास पिलाजी, राजु शिंपले, अभिषेक पिलाजी, अभयसिंह चौहान, बाबासाहेब जाधव, शिवाजी मायकर, नितीन शेठ कांबळे, निलेश ढगे, शफिक शेख, शशिकांत तोडकर, सोमनाथ भालेराव यांनी परिश्रम घेतले. शेवटी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई व तालुका आरोग्य कार्यालय यांचे आयोजकांनी आभार मानले. यावेळी नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post