अक्षर मानव एकांकिका विभागाच्या परळी तालुका अध्यक्षपदी रानबा गायकवाड, उपाध्यक्षपदी शेख गनी तर सचिव पदी विकास वाघमारे यांची निवड..!

अक्षर मानव एकांकिका विभागाच्या परळी तालुका अध्यक्षपदी रानबा गायकवाड, उपाध्यक्षपदी शेख गनी तर सचिव पदी विकास वाघमारे यांची निवड..!


परळी प्रतिनिधी

अक्षर मानव एकांकिका विभागाच्या परळी तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार रानबा गायकवाड यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते शेख गनी यांची तर सचिव पदी सिने नाट्य अभिनेते विकास वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


अक्षरमानवचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष राजू वाघमारे, राज्याचे सचिव प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व बीड जिल्हा अध्यक्ष ॲड.रणजीत वाघमारे यांच्या सूचनेनुसार आज जिजामाता उद्यान परळी येथे परळी तालुक्यातील कलाकार, नाट्य कलावंत यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढील कार्यकारणी याप्रमाणे निवडण्यात आली. प्रमुख कार्यवाह सिद्धेश्वर इंगोले, नागेश्वर खंदारे, संघटक बा.सो.कांबळे, सहसचिव केशव कुकडे, कार्यवाह अनंत सोळंके, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद कांबळे, मारुती कांबळे, नवनाथ दाने, विद्याधर सिरसाट, विनायक काळे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे तसेच राजू वाघमारे यांनी सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले. तसेच याप्रसंगी अक्षर मानव एकांकिका विभागाचे पुढील उपक्रम आणि विविध कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. लवकरच अक्षर मानव एकांकिका विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यात एकांकिका महोत्सव घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांनी दिली. नूतन कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post