इंद्रायणी कोचिंग क्लासेस व श्री.गजानन महाराज नवोदय गुरुकुलची शिष्यवृत्ती महासराव परीक्षा उत्साहात संपन्न...

इंद्रायणी कोचिंग क्लासेस व श्री.गजानन महाराज नवोदय गुरुकुलची शिष्यवृत्ती महासराव परीक्षा  उत्साहात संपन्न...



परभणी/प्रतिनिधी

येथील इंद्रायणी कोचिंग क्लासेस व श्री. गजानन महाराज नवोदय गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शिष्यवृत्ती महासराव परीक्षा 2026' नुकतीच दिमाखात पार पडली. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि पारदर्शक प्रक्रियेमुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आसन व्यवस्थेपासून ते वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक बाबतीत कमालीची सुसूत्रता दिसून आली.
परीक्षा संपल्यानंतर लगेच निकाल जाहीर करणे हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्व-मूल्यमापन करणे सोपे झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

या परीक्षेमध्ये सोहम गायकवाड या विद्यार्थ्याने 300 पैकी 248 गुण घेऊन तीन हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले, तसेच दिव्यांका दीपक पंडित या विद्यार्थिनीने 242 गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचे दोन हजार रुपये आणि गजानन महाराज गुरुकुलचा विद्यार्थी आयुष गोविंद हुंबाड 236 गुण मिळवून व हर्षवर्धन चव्हाण 230 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाचे अकराशे रुपयांचे पारितोषिक मिळवलं. तसेच गुणानुक्रमे इतर पंचवीस विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. इंद्रायणी  कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.ज्ञानेश्वर कटारे सर, श्री.गजानन महाराज नवोदय गुरुकुलचे संचालक प्रा.भारत पाते सर, परीक्षा यशस्वी करण्यात अनमोल सहकार्य करणारे  प्रा.गजानन दराडे सर आणि सर्व गुरुकुलचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली हा विद्यार्थीभिमुख उपक्रम यशस्वी झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे उत्तम विचारपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post