परळी नगर परिषदेकडून होत असलेल्या निष्काळजीपणाला उत्तर मिळणार;
ओमकार मिरकले यांचे ‘झिंगालाला आंदोलन’..
परळी वैजनाथ
परळी वैजनाथ नगर परिषदेकडून शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्ते ओमकार मिरकले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता ‘झगडा आंदोलन’ करण्यात येणार आहे.
‘स्वच्छ परळी, सुंदर परळी’ हेच आमचे ध्येय असल्याचे सांगत या आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आणला जाणार आहे. नगर परिषदेसमोर होणाऱ्या या आंदोलनात प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात आवाज उठवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
“नगर परिषदेने आता तरी जागे व्हावे; अन्यथा घाणीच्या साम्राज्यात जगणारी परळीची जनता उद्या माझ्यासारख्या वेषात दिसेल, याची कल्पनाही करवत नाही!” असा इशारा आंदोलनाच्या पोस्टरमधून देण्यात आला आहे.
शहरातील स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक परिसराची निगा याबाबत नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
आंदोलनाचे ठिकाण : परळी नगर परिषद समोर, परळी वैजनाथ
आंदोलनकर्ते : ओमकार मिरकले
वेळ : सकाळी ११.३० वाजता
दिनांक : गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६

Post a Comment